Vaibhav Sooryavanshi creates 5 records during 96-run knock
esakal
Gujarat Titans vs Rajasthan Royals, Qualifier 2 Marathi News: राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Sooryavanshi) याचे नाणे पुन्हा खणखणीत वाजले. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांसमोर तो तग धरून उभा राहिला आणि एकामागोमाग ५ मोठे विक्रम नावावर केले. पण, वैभवला पुन्हा एकदा शतकाने थोडक्यात हुलकावणी दिली. तो ४७ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह ९६ धावांवर झेलबाद झाला. मागील चार सामन्यांत तो तिसऱ्यांदा ९० व १०० धावांच्या टप्प्यात बाद झाला... पण, आजची त्याची खेळी खऱ्या अर्थाने परिपक्व राहिली.