

Rajasthan Royals sale under scanner
esakal
Kal Somani consortium legal action against RR sale : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सर्व संकटं राजस्थान रॉयल्सच्या अवतीभवती फिरताना दिसत आहेत.. आधी डग आऊटमध्ये मोबाईल वापरणारा सदस्य आणि नंतर कर्णधार रियान परागचे ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग... ही दोन्ही प्रकरणं कुठे निवळली असताना आता एक नवा वाद समोर आला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचे मालकी हक्क मित्तल कुटुंबिय आणि आदर पूनावाला यांनी १५६६० कोटींमध्ये जिंकले आहेत. पण, आता हा व्यवहार संशयाच्या भवऱ्यात सापडला आहे. कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील समूह आता RR विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे.