आयपीएल २०२६ साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८ खेळाडूंना रिलीज केले आहे. बंगळुरूने १७ खेळाडूंना रिटेन केले आहे. लिलावासाठी बंगळुरूकडे १६.४० कोटी रुपये शिल्लक आहेत..इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेसाठी रिटेंशन शनिवारी पूर्ण झाले. त्यामुळे आता आयपीएल २०२६ लिलावापूर्वी सर्व संघांनी संघात कायम केलेल्या आणि संघातून बाहेर केलेल्या खेळाडूंची यादी समोर आली आहे. आयपीएल २०२५ जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानेही त्यांच्या संघातून ८ खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये काही स्टार खेळाडूंचाही समावेश आहे..IPL 2026 Retention: कोणत्या संघाने कोणाला केलं रिलीज अन् कोणाला रिटेन, किती उरले पैसे? सर्व १० संघांची संपूर्ण लिस्ट .बंगळुरूने आयपीएल २०२५ मध्ये बदली खेळाडू म्हणून संघात घेतलेल्या मयंक अगरवाललाही संघातून रिलीज केले आहे. याशिवाय विराट कोहलीला आदर्श मानणाऱ्या स्वस्तिक चिकारालाही रिलीज करण्याचा बंगळुरूने निर्णय घेतला आहे. इतकेच नाही, तर इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन यालाही संघातून रिलीज केले आहे. या तिघांशिवाय बंगळुरूने टीम सिफर्ट, मनोज भंडागे, लुंगी एनगिडी, ब्लेसिंग मुझराबनी आणि मोहित राठी यांनाही रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे..बंगळुरूने आयपीएल २०२६ साठी कोणत्याच खेळाडूला ट्रेड केले नव्हते. त्यामुळे त्यांनी १७ खेळाडूंना रिटेन केले आहे, ज्यात कर्णधार रजत पाटिदार, विराट कोहलीसह देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पांड्या, जोश हेजलवूड, भुवनेश्वर कुमार, फिल सॉल्ट अशा स्टार खेळाडूंचा समावेश आहे..आता बंगळुरूकडे आयपीएल लिलावासाठी पर्समध्ये १६.४० कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. यातून त्यांना जास्तीत ८ खेळाडूंना खरेदी करता येणार आहे, ज्यात २ परदेशी खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे..IPL 2026 Retention: KKR कडून आंद्रे रसेलसह २३ कोटींचा वेंकटेश अय्यर रिलीज; अजिंक्य रहाणेसह केवळ 'या' खेळाडूंनाच केलं रिटेन.बंगळुरूने आयपीएल २०२६ साठी रिटेन केलेले खेळाडू - रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिक सलाम, अभिनंद शर्मा आणि अभिनंद शर्मा.बंगळुरूने रिलीज केलेले खेळाडू - स्वस्तिक चिकारा, मयंक अगरवाल, टिम सिफर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, मनोज भंडागे, लुंगी एनगिडी, आशीर्वाद मुझाराबानी आणि मोहित राठी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.