RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB IPL 2026 Marathi Cricket News : राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा खरा हिरो ठरला १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल...
Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi

esakal

Updated on

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Marathi Updates: समोर कोणताही दिग्गज असो, मी तर चेंडू हाणणारच... १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा ( Vaibhav Suryavanshi) हा निर्धार आता अनेकांच्या मनात भीती निर्माण करताना दिसतोय... मुंबई इंडियन्सविरुद्ध जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू ८८ मीटर लांब भिरकावल्यानंतर शुक्रवारी राजस्थान रॉयल्सच्या या सलामीवीराने जोश हेझलवूड व भुवनेश्वर कुमार या दोन दिग्गजांनाही नाही सोडले.

त्याने १५ चेंडूंत अर्धशतक झळकावताना अनेक विक्रम नावावर केले आणि ध्रुव जुरेल ( Dhruv Jurel) सोबत त्याच्या १०८ धावांच्या ( ३८ चेंडू) भागीदारीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हार मानण्यास भाग पाडले. ८ चौकार व ७ खणखणीत षटकार खेचूनही पुन्हा एकदा वैभवला शतकाने हुलकावणी दिली. पण, RR ने विजयी चौकार मारून IPL 2026 Point Table मध्ये अव्वल स्थान कायम राखले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com