Virat Kohli emotional video RCB farewell Evan Speechly
esakal
Why Virat Kohli cried during RCB farewell ceremony? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची वाटचाल दमदार सुरू आहे. मागील सामन्यांत गतविजेत्यांना हार पत्करावी लागली असली तरी ९ सामन्यांत सहा विजय मिळवून १२ गुणांसह ते गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा पुढील मुकाबला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ७ मे रोजी होणार आहे. त्यासामन्यापूर्वी RCB च्या ड्रेसिंग रूममधील वातावरण अचानक भावनिक झालेलं पाहायला मिळालं. संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्या डोळ्यांत पाणी पाहायला मिळाले. RCB सोबत १८ वर्ष असलेल्या सदस्याचा निरोप समारंभ पार पडला आणि विराट भावूक झाल्याने, तो या व्यक्तीशी किती अटॅच होता हे दिसून येते.