

IPL 2027, Impact Player Rule Update
Sakal
IPL 2027, Impact Player Rule Update: इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये गेल्या काही हंगामांपासून 'इम्पॅक्ट प्लेअर' चा नियम लागू आहे. त्यामुळे संघांना एक ज्यादाचा (१२ वा खेळाडू) संघात खेळवता येतो. पण या नियमावर अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती, ज्यात रोहित शर्मा, विराट कोहली यांचाही समावेश आहे.
यामुळे अष्टपैलू खेळाडूचे महत्त्व कमी होत असल्याचाही सूर क्रिकेटवर्तुळात होता. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेअरचा नियम (Impact Player Rule) सुरुवातीलापासूनच चर्चेत राहिला, त्यामुळे हा नियम आयपीएल २०२७ मधून काढून टाकला जाणार का, असा प्रश्न होता. आता याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.