

Rest of India Defeat Jammu & Kashmir to win Irani Cup 2026
Sakal
Rest of India vs Jammu & Kashmir, Irani Cup 2026 Match: भारतातील प्रतिष्ठीत देशांतर्गत स्पर्धा इराणी कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद रिषभ पंतच्या नेतृत्वातील शेष भारतीय संघाने (Rest of India) जिंकले आहे.
श्रीनगरला झालेल्या सामन्यात शेष भारतीय संघाने रणजी ट्रॉफी २०२५-२६ विजेत्या जम्मू-काश्मीर संघाला १६७ धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. इराणी कप स्पर्धेत एकच सामना होतो, जो शेष भारत विरुद्ध त्यावर्षीच्या रणजी ट्रॉफी विजेत्या संघांमध्ये खेळवला जातो.