
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराटने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता विराट केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
दरम्यान, आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने कसोटीतून निवृत्ती घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. विराट भारताकडून जवळपास दोन दशकांपासून क्रिकेट आता खेळत आहे. त्यामुळे त्याचा जर्सी क्रमांक १८ ही त्याची एकप्रकारे ओळखही बनली आहे. पण आता कसोटीतून निवृत्तीनंतर त्याचा हा जर्सी क्रमांक दुसऱ्या कोणाला मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.