
रॉयल चॅलेंजर्स बंगळरूच्या संघात सध्या आनंदाचं वातावरण आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत बंगळुरूने मंगळवारी (२५ मे) त्यांचे सर्वात मोठे लक्ष्य पार करत लखनौ सुपर जायंट्सला ६ विकेट्सने पराभूत केले. हा स्पर्धेतील अखेरचा साखळी सामनाही होता.
२२८ धावांचं लक्ष्य बंगळुरूने यशस्वी पार केलं. इतकंच नाही, तर या विजयासह बंगळुरूने पाँइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्थानही मिळवले. त्यामुळे बंगळुरूने क्वालिफायर १ सामन्याचे तिकीटही मिळवले. त्यामुळे बंगळुरूसाठी हा आनंदाचा क्षण होता. त्याचे परिणाम त्यांच्या ड्रेसिंग रुममध्येही दिसले.