
Australia vs India 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये गॅबा स्टेडियमवर सामना होत आहे. शनिवारी सुरू झालेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहबाबत केलेल्या कमेंटबाबत इंग्लंडची माजी महिला क्रिकेटपटू इशा गुहाला माफी मागावी लागली आहे.
तिने बुमराहचे कौतुक करताना केलेली कमेंट वर्णभेदी असल्याची टीका झाली होती. त्यामुळे तिने या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी समालोचन करताना माफी मागितली.