ISHAN KISHAN TO CAPTAIN EAST ZONE TEAM IN DULEEP TROPHY : पश्चिम विभागापाठोपाठ पूर्व विभागानेही दुलीप ट्रॉफी २०२५ साठी आपला संघ जाहीर केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संघाचे नेतृत्व टीम इंडियाच्या कसोटी संघाबाहेर असलेल्या इशान किशनकडे ( Ishan Kishan) याच्याकडे सोपवण्यात आले आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत असलेले दोन खेळाडू आता इशानच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, शिवाय अनुभवी जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी हाही या संघात आहे. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला स्टँडबाय ठेवण्यात आले आहे.