Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Ishan Kishan Gets Angry at Delhi Airport Media Interruption: आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय टी२० संघातील खेळाडू रात्री १ वाजता दिल्लीमध्ये आले. यावेळी ईशान किशन अचानक चिडल्याचे दिसला होता. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Viral Video

Ishan Kishan Loses Cool at Media

Sakal

Updated on: 

Ishan Kishan Loses Cool at Media: भारतीय टी२० संघाने नुकतेच ३ ऑक्टोबर रोजी आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत सुवर्णपदक (Asian Games Gold Medal) जिंकले. अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले आणि सुवर्णपदक जिंकले.

या मोठ्या यशानंतर लगेचच भारतीय संघ मायदेशी परतला आहे. कारण ६ ऑक्टोबरपासून भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिका (India vs West Indies, T20I Series) खेळायची आहे. दरम्यान, भारतीय खेळाडू मायदेशी परतल्यानंतर विमानतळावर एका गोष्टीमुळे ईशान किशन चांगलाच वैतागलेला दिसला.

Viral Video
द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com