India's Likely Playing XI for 3rd T20I vs NZ
esakal
India vs New Zealand 3rd T20I predicted playing XI 2026: भारत-न्यूझीलंड यांच्यातला तिसरा ट्वेंटी-२० सामना मंगळवार दिनांक २७ ऑक्टोबरला वेलिंग्डनच्या हेन्री स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघ विजयाची हॅटट्रिक साजरी करून मालिका खिशात घालण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर यजमान न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान टीकवण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल. भारताने दुसऱ्या सामन्यात थरारक विजय मिळवला, पंरतु गोलंदाजी विभागात पुन्हा एकदा निराशा झाली. त्यात संधी मिळालेला वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Sooryavanshi) फार कमाल करू शकला नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतो.