Sanju Samson celebrates in his trademark style at Eden Gardens during a crucial innings.
esakal
Why Sanju Samson said his celebration was very special: संजू सॅमसनने त्याच्या कारकीर्दितली सर्वोत्तम खेळी काल कोलकाताच्या इडन गार्डनवर केली. संजूची नाबाद ९७ धावांची खेळी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुर्वणाक्षराने लिहिली जाणारी ठरली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला हा सामना जिंकावाच लागणार होता. वेस्ट इंडिजने १९६ धावांचे लक्ष्य ठेवले आणि संजू एकटा संपूर्ण संघावर भारी पडला. त्याने ५० चेंडूंत ९७ धावांची ऐतिहासिक खेळी केली. विजयी चौकार खेचल्यानंतर संजू गुडघ्यावर बसला, हेल्मेट काढून दूर फेकले.. दोन्ही हात वर करून देवाचे आभार मानले....त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.