Vaibhav Sooryavanshi
esakal
Vaibhav Sooryavanshi suit story at Wimbledon Final 2026: भारतीय संघाचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी हा रविवारी विम्बल्डनच्या पुरुष एकेरी फायनल पाहायला अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांच्यासोबत पोहोचला. यावेळी वैभवला त्याच्या पहिल्या वहिल्या विम्बल्डन फायनल अनुभवाबद्दल विचारले गेले आणि त्याच्या साध्याभोळ्या उत्तराने सर्वांची मनं पुन्हा एकदा जिंकली. अंतिम सामन्यात यानिक सिन्नरने ६-७ ( ७), ७-६ ( २), ६-३, ६-४ अशा फरकाने अॅलेक्झांडर झाव्हरेव्हचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन ट्रॉफी जिंकली.