
Australia Open 2025: ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद २३ वर्षीय यानिक सिनरने पटकावले. हे त्याचे सलग दुसरे ऑस्ट्रेलियन विजेतेपद आहे, तसेच एकूण तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.
अंतिम सामन्यात इटलीच्या सिनरने जर्मनीच्या अलेक्झँडर झ्वेरेव (साशा) याला पराभवाचा धक्का दिला. सिनरने झ्वेरेवला सरळ तीन सेटमध्ये ६-३, ७-६ (७-४), ६-३ फरकाने पराभूत केले. झ्वेरेवचा हा ग्रँडस्लॅममधील अंतिम सामन्यातील तिसरा पराभव आहे.