

India vs New Zealand 1st Test Lunch
Sakal
New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वेलिंग्टन येथे कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला गुरुवारी (१९ नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. या सामन्यातील पहिले सत्र तरी भारताच्या नावावर राहिले आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांनी पहिल्या सत्रात हिरव्यागार खेळपट्टीचा चांगला फायदा उचलत न्यूझीलंडच्या ४ विकेट्स घेत अडचणीत टाकले आहे.
खेळपट्टीवर गवत ठेवल्याने वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार होती, हे लक्षात घेऊन भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.