
इंग्लंड क्रिकेट संघाने भारताविरुद्ध अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी या कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना बुधवारी (२ जुलै) सुरू होणार आहे. हा सामना बर्मिंगहॅममधील ऍजबॅस्टनमध्य खेळवला जाणार आहे.
या सामन्यासाठी काही दिवसांपूर्वीच इंग्लंडने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा संघात समावेश केला होता. त्यामुळे २०२१ नंतर पहिल्यांदात आर्चर इंग्लंडकडून कसोटी खेळताना दिसेल, अशी अपेक्षा अनेकांना होती.