
जसप्रीत बुमराह हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज समजला जातो. त्याने वेळोवेळी भारतासाठी खेळताना हे सिद्धही केले आहे. त्याच्या नावावर मोठे विक्रमही असून आता यात आणखी एका मोठ्या विक्रमाची भर पडली आहे.
हेडिंग्लेमध्ये शुक्रवारपासून (२० जून) इंग्लंड आणि भारत संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान, बुमराहने मोठा विक्रम नावावर केला आहे.