

Jasprit Bumrah
Sakal
Jasprit Bumrah Replacement Options: भारतीय संघ लवकरच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ५ टी२०, ५ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. पण वनडे आणि कसोटी मालिकेसाठी येत्या काही दिवसातच घोषणा होईल, असं बीसीसीआयने टी२० संघ जाहीर करताना सांगितले होते.
अशातच अशी माहिती समोर आली आहे की निवड समितीचे अंतरिम प्रमुख प्रज्ञान ओझा याने बुधवारी कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली आहे.