
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी रात्री उशीरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेबाबत मोठी घोषणा केली. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या प्राथमिक संघात अखेरच्या क्षणी दोन मोठे बदल करण्यात आले आहेत.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पूर्ण तंदुरुस्त नसल्याने या स्पर्धेला मुकणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. याशिवाय यशस्वी जैस्वाललाही संघातून वगळण्यात आले आहे.
बीसीसीआयने बुमराहच्या जागेवर हर्षित राणाला, तर जैस्वालच्या जागेवर फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला भारतीय संघात स्थान दिले आहे.