IND vs NZ, 1st Test: बुम बुम बुमराह! तिसऱ्याच बॉलवर न्यूझीलंडच्या कर्णधाराला केलं क्लिन बोल्ड, दोन्ही ओपनर बाद; Video

Jasprit Bumrah dismisses Tom Latham for duck: भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांनी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत दमदार सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराहने तिसऱ्याच चेंडूवर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला शून्यावर बाद केले आहे.
Jasprit Bumrah clean bowled Tom Latham | India vs New Zealand 1st Test

Jasprit Bumrah clean bowled Tom Latham | India vs New Zealand 1st Test

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून पहिला सामना वेलिंग्टनला गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) खेळला जात आहे. या सामन्यात भारताने दणक्यात सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराह आणि अंशुल कंबोज यांनी सुरुवातीलाच विकेट घेण्यात यश मिळवले. ही मालिका कसोटी अजिंक्यपद २०२५-२७ (WTC 2025-27) स्पर्धेचा भाग असल्याने महत्त्वाची आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला जसप्रीत बुमराह आणि अंशुल कंबोजने (Jasprit Bumrah & Anshul Kamboj) सुरुवातीला न्याय दिला. या सामन्यातून जसप्रीत बुमराह पुनरागमन करत आहे. त्याला न्यूझीलंड दौऱ्यातील टी२० आणि वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.

Jasprit Bumrah clean bowled Tom Latham | India vs New Zealand 1st Test
IND vs NZ, 1st Test: शुभमन गिलने टॉस जिंकला! सिराजला मात्र पहिल्या कसोटीतही बाहेर बसवलं, कोणाला मिळाली Playing XI मध्ये संधी?
Loading content, please wait...