

Jasprit Bumrah reportedly declined Mumbai Indians' offer to serve as Rohit Sharma's deputy for IPL 2027.
Sakal
Why Jasprit Bumrah Turned Down Mumbai Indians Vice-Captaincy Offer: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा कर्णधार केले आहे. गेल्या तीन हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी अपेक्षित झाली नव्हती. याशिवाय चाहत्यांचीही रोहितला २०२४ आयपीएलपूर्वी कर्णधारपदावरून काढल्याने नाराजी होती.
त्यातच २०२६ मध्ये मुंबईला मोठा धक्का बसला, त्यांचा संघ ९ व्या क्रमांकावर राहिला होता. त्यानंतर मुंबईने मोठी पावले उचलली. काही दिवसांपूर्वीच हार्दिक पांड्याचे ट्रेड पंजाब किंग्ससोबत अर्शदीप सिंगच्या बदल्यात झाले. यानंतर आता मुंबईने कर्णधार म्हणून रोहित शर्मावर पुन्हा भरवसा दाखवला आहे.