"संजूने तुझी जागा घेतली म्हणून..."; Shubman Gill ने मुद्दाम टीम इंडियाच्या फोटोतून संजूला क्रॉप केल? नेटिझन्सकडून आरोप, एकाने तर...

Shubman Gill accused of cropping Sanju Samson from photo: भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा सोशल मीडियावर वाद पेटला आहे. शुभमन गिल याच्यावर चाहत्यांनी गंभीर आरोप केले आहेत. काही नेटिझन्सच्या मते, गिलने टीम इंडियाचा फोटो पोस्ट करताना त्यातून संजू सॅमसन याला मुद्दाम क्रॉप केले.
Shubman Gill accused of cropping Sanju Samson from photo

Shubman Gill accused of cropping Sanju Samson from photo

esakal

Updated on

Did Shubman Gill remove Sanju Samson from team picture? भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वन डे व कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याने फोटोसह Champion अशी पोस्ट त्याच्या इस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी शुभमन ट्वेंटी-२० संघाचा उप कर्णधार होता आणि तो अभिषेक शर्मासह सलामीला खेळला होता. पण, खराब फॉर्मामुळे त्याला निवड समिती प्रमुख अजित आगरकर याने वर्ल्ड कप संघातून वगळले. त्यामुळे संजूला सलामीला खेळण्याची संधी मिळाली. शुभमनने भारताच्या विजयानंतर पोस्ट केलेल्या फोटोत संजू सॅमसन दिसत नसल्याने आता शुभमनवर आरोप होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com