

Jitesh Sharma
Sakal
भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकली, पण या स्पर्धेपूर्वी ज्या खेळाडूंना संघातून अचानक वगळण्यात आले होते, त्यांची बरीच चर्चा झाली होती. या खेळाडूंमध्ये यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा (Jitesh Sharma) याचाही समावेश होता.
पण याबाबत कोणताही पश्चाताप नसल्याचे जितेशने सांगितले, तसेच त्याने मोठा खुलासाही करताना सांगितले की यामुळे त्याला त्याच्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये वेळ देता आला. जितेशने टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup) सुरू होण्याच्या आधी त्याच्या वडिलांना (Father's Demise) गमावले.