
भारत आणि इंग्लंड संघात लॉर्ड्सवर कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुटने पहिल्या डावात शतक केले होते. त्याने दुसऱ्या डावातही चांगली खेळी केली. यादरम्यान त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात इंग्लंड आणि भारत दोन्ही संघांनी पहिल्या डावात प्रत्येकी ३८७ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरला आहे. पण इंग्लंडने पहिल्या ४ विकेट्स झटपट गमावल्या होत्या. ८७ धावांवरच इंग्लंडने चार विकेट्स गमावल्या, ज्यात झॅक क्रॉली (२२), बेन डकेट (१२), ऑली पोप (४) आणि हॅरी ब्रुक (२३) यांच्या विकेट्सचा समावेश होता.