
New Zealand vs England 1st Test: इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला. इंग्लंड संघाने ख्राईस्टचर्चला झालेल्या पहिल्या कसोटीत ८ विकेट्सन विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, हा सामना इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रुटचा कसोटी कारकिर्दीतील १५० वा सामना होता. पण तो पहिल्या डावात शुन्यावर बाद झाला होता. मात्र, दुसऱ्या डावात त्याने नाबाद राहत सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे. जो रुट यावर्षी दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने कसोटीत २०२४ मध्ये सर्वाधिक धावाही केल्या आहेत.