
New Zealand vs England Test: न्यूझीलंड दौऱ्याची सुरूवात इंग्लंडने दणक्यात केली आहे. ख्राईस्टचर्चला झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने चौथ्या दिवशी (१ डिसेंबर) ८ विकेट्सने विजय मिळवला.
या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मात्र, या पराभवामुळे न्यूझीलंडचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्याचा मार्गही कठीण झाला आहे.