
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. कसोटीत त्याने गेल्या काही वर्षात धावांचा रतीब घातला असतानाच आता तो वनडेतही तशाच लयीत खेळताना दिसत आहे. त्याने रविवारी वनडेत इंग्लंडसाठी आत्तापर्यंत कोणालाच न जमलेला विक्रम करून दाखवला आहे.
सध्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघात वनडे मालिका सुरू असून दुसरा सामना कार्डिफमधील सोफिया गार्डन्स येथे रविवारी झाला. या सामन्यात जो रुटने शतकी खेळी केली.