ENG vs PAK, Test: जो रुटची सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी, तर ब्रुकचं शतक हुकलं; इंग्लंडने पाकिस्तानची उडवली झोप

Joe Root Equals Sachin Tendulkar’s Milestone: लीड्स कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध भली मोठी आघाडी घेतली आहे. कर्णधार जो रुटने अर्धशतक करत सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली, तर हॅरी ब्रुकचं शतक थोडक्यात हुकलं.
Joe Root | England vs Pakistan 1st Test

Joe Root | England vs Pakistan 1st Test

Sakal

Updated on

England vs Pakistan, 1st Test Marathi: इंग्लंड क्रिकेट संघाने लीड्सला पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात मोठी आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा कर्णधार जो रुटने (Joe Root) मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) एका विश्वविक्रमाशी (World Record) बरोबरी केली आहे.

या सामन्यात गुरुवारी (२० ऑगस्ट) दुसऱ्या दिवशी सुरुवातीला पावसाचा मोठा अडथळा आला होता, त्यामुळे खेळ सुरू होण्यास उशीर झाला. पण त्यानंतर खेळ सुरू झाल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी अफलातून फलंदाजी केली. जो रुटसह चार खेळाडूंनी अर्धशतक केल्याने इंग्लंडला दुसऱ्या दिवस अखेर १९५ धावांची मोठी आघाडी मिळाली आहे.

Joe Root | England vs Pakistan 1st Test
ENG vs PAK: इंग्लंडच्या गोलंदाजांनी चेंडूचे दोन तुकडे का केले? पाकिस्तानच्या पहिल्या डावानंतर नेमकं काय घडलं? Video viral
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com