

Joe Root
Sakal
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) स्पर्धेला २०१७ पासून सुरुवात झाली असून सध्या या स्पर्धेचे चौथे पर्व सुरू आहे. गेल्या तीन पर्वात तीन विजेते या स्पर्धेला मिळाले आहेत. दरम्यान, या स्पर्धेमुळे सध्या कसोटी मालिकेतील प्रत्येक सामने महत्त्वाचे ठरत आहेत. सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून ही मालिका देखील WTC 2025-27 स्पर्धेचा भाग आहे.
या मालिकेपासून इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पुन्हा एकदा जो रुटने स्वीकारली आहे. असे असतानाच त्याने पहिल्याच सामन्यात आजपर्यंत कोणत्याही कर्णधाराला न करता आलेला कारनामा केला आहे.