

Joe Root Complete 14000 Runs
Sakal
Joe Root Joins Sachin Tendulkar In Elite Club: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात (ENG vs NZ) कसोटी मालिकेचा दुसरा सामना लंडनमध्ये सुरू आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा प्रभारी कर्णधार जो रुटने कसोटी कारकिर्दीत मोठा पल्ला गाठला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचे वर्चस्व राहिले असले तरी जो रुटसाठी वैयक्तिकदृष्टीने हा सामना खास ठरला आहे.
या सामन्यात चौथ्या दिवशी (शनिवार, २० जून) न्यूझीलंडने इंग्लंडसमोर ४६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र इंग्लंडने दुसऱ्या डावात बेन डकेट (९), एमिलियो गे (११) आणि जेकॉब बेथल (०) यांच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या. पण नंतर जो रुटने हॅरी ब्रुकला साथीला घेत डाव सावरताना ९७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, रुट आणि ब्रुक या दोघांचीही अर्धशतके झाली.