
इंग्लंडने भारताविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला. त्यामुळे बेन स्टोक्सच्या इंग्लंड संघाने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिली कसोटी फलंदाजांनी गाजवली असली तरी आता दुसऱ्या कसोटीत इंग्लंड गोलंदाजीतही धारदार आक्रमण करण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. तसा धोकादायक गोलंदाजालाही त्यांनी संघात स्थान दिले आहे.
२ जुलैपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने ३० वर्षीय वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा संघात समावेश केला आहे. त्यामुळे तब्बल ४ वर्षांनी आर्चर इंग्लंडसाठी कसोटी खेळताना दिसणार आहे.