

Jos Buttler on His Future International Cricket Career
Sakal
Jos Buttler Opens Up on His International Career: इंग्लंडचा माजी कर्णधार जॉस बटलरसाठी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा फारशी खास ठरली नव्हती. त्याने या स्पर्धेत ८ सामन्यात केवळ ८७ धावा केल्या. त्यामुळे त्याच्या फॉर्मवर आणि संघातील जागेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. याशिवाय त्याच्या निवृत्तीबाबतही (Retirement) चर्चेला सुरुवात झाली. आता याबाबत स्वत: बटलरनेच (Jos Buttler) भाष्य केले आहे.
३५ वर्षीय बटलर इंग्लंडचा टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ४००० धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच्या नेतृत्वात २०२२ मध्ये इंग्लंडने टी२० वर्ल्ड कपही (T20 World Cup) जिंकला होता.