Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

Jos Buttler IPL 2024 Play Off
Jos Buttler IPL 2024 Play OffEesakal

Jos Buttler IPL 2024 Play Off : राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलर हा आयपीएल 2024 च्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने राजस्थानाच्या अनेक विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. मात्र आता राजस्थानला मोठा धक्का बसणार आहे. नुकतेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी 20 वर्ल्डकपपासाठी आपला संघ जाहीर केला. जॉस बटलर या संघाचं नेतृत्व करत आहे. त्यामुळे तो आयपीएल प्ले ऑफमध्ये खेळण्याची शक्यता धुसर झाली आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नुकतेच टी 20 वर्ल्डकप 2024 साठी आपला संघ जाहीर केला. या संघात जोफ्रा आर्चरचे पुनरागमन झाले आहे. जो बराच काळ दुखापतीमुळे संघाबाहेर होता. इसीबीने आपल्या प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात म्हणाले की, 'जोफ्रा आर्चर हा उजव्या कोपराच्या दुखापतीतून सावरला आहे. त्याला संघात स्थान दिलं आहे.'

Jos Buttler IPL 2024 Play Off
Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

गेल्या जानेवारी महिन्यापासून आर्चर हा संघात पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होता. त्याने ससेक्सकडून प्री सेशन कॅम्प देखील केला. हा कॅम्प दुबई आणि बंगळुरू येथे झाला होता.

इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व जॉस बटलरकडे देण्यात आलं आहे. 2022 च्या टी20 वर्ल्डकपमध्ये देखील त्यानं संघाचे नेतृत्व केलं होतं. संघात टॉम हार्टली हा एकमेव अनकॅप्ट प्लेअर आहे.

दरम्यान, जॉस बटलर, मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लाईम लिव्हिंगस्टोन, फिल्प सॉल्ट, विल जॅक्स, रीसे टोप्ले हे सर्व आयपीएल खेळत आहेत. मात्र या सर्वांना आयपीएल सोडून इंग्लंडच्या संघाला जाईन करावं लागणार आहे. ते 22 मे पासून पाकिस्तानविरूद्ध टी 20 मालिका खेळणार आहेत. त्यामुळे ते आयपीएलच्या प्ले ऑफला मुकण्याची दाट शक्यता आहे.

Jos Buttler IPL 2024 Play Off
T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

इंग्लंडचा वर्ल्डकप संघ 31 मे रोजी वेस्ट इंडीजसाठी रवाना होईल. इंग्लंडचा पहिला सामना हा स्कॉटलँडसोबत 4 जूनला होणार आहे.

इंग्लंडचा टी20 वर्ल्डकप संघ :

जॉस बटलर, मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टली, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लाईम लिव्हिंगस्टोन, आदिल राशीद, फिल सॉल्ट, रीसे टॉप्ले, मार्क वूड.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com