Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Josh Baker Died: इंग्लंडच्या 20 वर्षीय फिरकी गोलंदाजाचे निधन झाल्याने क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.
Josh Baker
Josh BakerX/WorcsCCC

Josh Baker Died: क्रिकेटविश्वाला धक्का देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. इंग्लंडचा 20 वर्षीय उदयोन्मुख खेळाडू जोश बेकर याचे निधन झाले आहे. त्याच्या निधनाची पुष्टी त्याचा काउंटी क्लब वूस्टरशायरने केली आहे.

दरम्यान, क्लबने दिलेल्या अधिकृत माहितीमध्ये त्याच्या निधनाचे स्पष्ट कारण देण्यात आलेले नाही. मात्र, त्याच्या कुटुंबाच्या वतीने त्यांच्या खाजगी आयुष्याचा या कठीण काळात आदर राखला जावा, याची विनंती करण्यात आली आहे.

Josh Baker
Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

जोश बेकरने 2021 मध्ये वूस्टरशायरबरोबर करार केला होता. त्याने कारकि‍र्दीत 22 प्रथम श्रेणी सामने खेळताना 43 विकेट्स घेतल्या, तर 17 लिस्ट ए प्रकारात 24 विकेट्स घेतल्या आहेत.

याशिवाय तो 9 टी20 सामने खेळला होता, ज्यात त्याने 3 विकेट्स घेतलेल्या. त्याने फलंदाजी करतानाही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 अर्धशतकांसह 411 धावा केल्या होत्या.

Josh Baker
Rinku Singh Team India T20 Squad : वाईट दिवस... रिंकूला डावलले, खास मित्र स्टेटस ठेवत म्हणाला...

वूस्टरशायरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऍश्ली गिल्स यांनी म्हटले आहे की 'जोशच्या जाण्याने आमच्या सर्वांनाच धक्का बसला आहे. तो फक्त एक संघसहकारी नव्हता, पण तो आमच्या क्रिकेट कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग होता. आम्ही त्याला मिस करू. आमचं प्रेम आणि प्रार्थना जोशच्या कुटुंबासमवेत आणि मित्रपरिवाराबरोबर आहेत. '

महत्त्वाचे म्हणजे तो गेल्याच महिन्यात वूस्टरशायककडून क्रिकेट खेळला होता. 16 मे 2003 रोजी जन्मलेल्या जोश बेकर 19 वर्षांखालील इंग्लंड संघाकडूनही खेळला आहे.

त्याच्या निधनाबद्दल इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही शोक व्यक्त केला आहे. तसेच क्रिकेट विश्वातूनही शोक व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com