
New Zealand vs England 3rd Test: न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात हॅमिल्टनला तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात केन विलियम्सनने अफलातून फलंदाजी केली आहे.
पहिल्या डावात पायाने चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात दुर्दैवीरित्या क्लिन बोल्ड झाल्याने अर्धशतक हुकलेल्या विलियम्सनने दुसऱ्या डावात मात्र शानदार फलंदाजी करत शतक केले. याबरोबरच त्याने काही विक्रमही केले आहेत.