
New Zealand vs England 3rd Test: न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना शनिवारी (१४ डिसेंबर) सुरू झाला. हेमिल्टनला होत असलेल्या या सामन्यात न्यूझीलंड व्हाईटवॉश टाळण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. कारण या मालिकेतील पहिले दोन्ही सामने इंग्लंडने जिंकले असून आधीच मालिका खिशात घातली आहे.
तिसऱ्या सामन्यात पहिल्या दिवस अखेर न्यूझीलंडने ८२ षटकात ९ बाद ३१५ धावा केल्या आहेत. दरम्यान, पहिल्या दिवशी केन विल्यमसनने मात्र खूपच विचित्र पद्धतीने विकेट गमावली.