
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी २०२५-२६ या वर्षासाठी वार्षिक करार मिळालेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. यात ४ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र वार्षिक करार मिळालेल्या खेळाडूंच्या यादीत दिग्गज केन विलियम्सनचं नाव नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विलियम्सन न्यूझीलंडचा प्रमुख खेळाडू आहे.