
फेब्रुवारीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सहभागी संघांपैकी अनेक संघांनी त्यांचे संघ घोषित केले आहेत. त्यामुळे आता भारतीय संघातही कोणाला संधी मिळणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. या दरम्यान, एक नाव प्रचंड चर्चेत आहे, ते नाव म्हणजे करुण नायर.
३३ वर्षीय करुण नायर त्याच्या खेळाने लक्षही वेधतोय आणि भारतीय संघाचं दारही ठोठावतोय. भारतीय संघात पदार्पणानंतर विक्रमी त्रिशतक आणि मग संघातून गच्छंती, ते कर्नाटककडूनही निराशाजनक कामगिरी अनेक चढउतार त्याने पाहिले. त्यानंतर त्याने विदर्भाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्याच्यासाठी फलदायीही ठरला. त्याने विदर्भासाठी धावांचा पाऊस पाडत पुन्हा भारतीय संघाकडून घेऊन जाईल असा मार्गही स्वत:साठी तयार केला.