

Kavya Maran Celebration
Sakal
SRH vs CSK Video: सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला शनिवारी (१८ एप्रिल) आयपीएल २०२६ स्पर्धेतील २७ व्या सामन्यात पराभूत केले. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेला हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला, ज्यात हैदराबादने १० धावांनी विजय मिळवला. हा हैदराबादचा ६ सामन्यांतील तिसरा विजय होता.
या सामन्यासाठी हैदराबादची संघमालकीण काव्या मारनही (Kavya Maran) सामन्यासाठी उपस्थित होती. तिने विजयाचे जोरदार सेलिब्रेशनही (Celebration) केले. तिचेने अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असून यातील एका व्हिडिओची जोरदार चर्चा आहे.