Wasim Akram mocks the long IPL calendar
esakal
Wasim Akram Renews IPL vs PSL Debate: पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रम याने पाकिस्तान सुपर लीग ( PSL) ही इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) तुलनेत वरचढ असल्याचा दावा केला आहे. पीएसएलच्या प्रमोशनल कार्यक्रमात अक्रमने आयपीएलच्या कालावधीवर टीका करताना खिल्ली उडवली. त्याच्यासोबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी, रमीझ राजा, पीएसएलचे सीईओ सलमान नासीर, हॅरिस रौफ व साहिबजादा फरहान हे होते. 'बच्चे बडे हो जाते है, वोह लीग खतम ही नही होती ( मुलं लहानाची मोठी होतात, परंतु ती लीग संपतच नाही.),' असे अक्रमने विधान केले.