KKR vs GT: 22 Sixes...! फिन ऍलेन, रघुवंशीची वादळी खेळी, पण शतक हुकलं; कोलकाताने IPL 2026 मध्ये कोणालाच न जमलेला पराक्रम केला

Kolkata Knight Riders vs Gujarat Titans: आयपीएल २०२६ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सकडून फिन ऍलेन, अंगक्रिश रघुवंशी आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी गुजरात टायटन्सविरुद्ध अर्धशतके केली. त्यामुळे कोलकाताने गुजरातसमोर भलंमोठं लक्ष्य ठेवलं आहे.
Finn Allen - Angkrish Raghuvanshi | KKR vs GT  | IPL 2026

Finn Allen - Angkrish Raghuvanshi | KKR vs GT | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026, KKR vs GT marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत शनिवारी (१६ मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना खेळवला जात आहे. ईडन गार्डन्सवर होत असलेल्या या सामन्यात कोलकाताने सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या आणि प्लेऑफची जागा पक्की करू पाहाणाऱ्या गुजरात टायटन्ससमोर २४८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

कोलकातासाठी फिन ऍलेन, अंगक्रिश रघुवंशी आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी आक्रमक फलंदाजी केली. या तिघांचीही अर्धशतके झाली आहेत.

या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. कोलकाताकडून फिन ऍलेन आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी डावाची सुरुवात केली. फिन ऍलेन (Finn Allen सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत होता. मात्र ५ व्या षटकात अजिंक्य रहाणेला मोहम्मद सिराजने १४ धावांवर त्रिफळाचीत करत कोलकाताला मोठा धक्का दिला.

Finn Allen - Angkrish Raghuvanshi | KKR vs GT  | IPL 2026
IPL 2026, KKR vs GT: 'करो वा मरो' सामन्यात कोलकाताने हरला टॉस! कर्णधार रहाणे म्हणाला, 'आम्हाला तीन सामने आता...'
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com