Deepak Chahar and Robin Minz dropped catch video
esakal
Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Marathi Cricket News: कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात दीपक चहर ( Deepak Chahar) आणि रॉबिन मिंझ यांच्या गैरसमजातून एक सोपा झेल सुटला आणि कर्णधार हार्दिक पांड्यालाही तोंड लपवण्याची वेळ आली. हार्दिकच्या गोलंदाजीवर रोव्हमन पॉवेलने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत गेला, पण दीपक चहर आणि रॉबिन मिंझ दोघेही झेल घेण्यासाठी पुढे आले नाहीत. दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले आणि चेंडू त्यांच्या समोरच पडला. त्यानंतर दोघांनी एकमेकांकडे हातवारे करत जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला.