

KL Rahul's Powerful Sweep Shot Hits Nishan Madushka | Sri Lanka vs India 1st Test
Sakal
Sri Lanka vs India 1st Test Marathi News: श्रीलंका विरुद्ध भारत संघात शनिवारी (१५ ऑगस्ट) गॉलमध्ये पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. पावसाचा काहीसा अडथळा आलेल्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने या सामन्यात वर्चस्व ठेवले आहे. पहिला दिवस देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी गाजवला.
मात्र या सामन्याच्या पहिल्याच सत्रात काळजाचा ठोका चुकवणारीही एक घटना घडली. श्रीलंकेचा निशान मदुष्का (Nishan Madushka) गंभीर दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावला.