IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

India A Head Coach vs Australia A: ऑस्ट्रेलिया अ संघ भारत दौऱ्यावर येत असून वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारतीय अ संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण असणार, याबाबत माहिती समोर आली आहे.
Lakshmipathy Balaji Named India A Head Coach

Lakshmipathy Balaji Named India A Head Coach

Sakal

Updated on

India A Head Coach Against Australia A: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेच्या पूर्वतयारीसाठी ऑस्ट्रेलिया त्यांचा अ संघ भारतीय दौऱ्यावर पाठवत आहेत.

ऑस्ट्रेलिया अ संघ भारत दौऱ्यावर कसोटी (चार दिवसीय सामने) आणि वनडे मालिका सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान खेळणार आहे. या मालिकासांठी भारतीय अ संघाची घोषणाही झाली आहे. पण आता या भारतीय अ संघांचा मुख्य प्रशिक्षक कोण असणार आहे, याबाबत माहिती समोर आली आहे.

दोन वेळचा आयपीएल विजेता लक्ष्मीपती बालाजी (Lakshmipathy Balaji) या सामन्यांसाठी भारतीय अ संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणार आहे. बालाजीने यापूर्वी आयपीएलमध्ये प्रशिक्षकपद सांभाळले असले, तरी भारताच्या कोणत्याही संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. याबाबत पीटीआयने माहिती दिली आहे.

Lakshmipathy Balaji Named India A Head Coach
India A Squad: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार हार्दिक पांड्या; ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय अ संघ जाहीर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com