

India A Squad Announced vs Australia A
Sakal
India A Squad Announced vs Australia A: ऑस्ट्रेलिया संघ पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारत दौरा करणार असून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण त्याआधी पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलिया अ संघ सप्टेंबर २०२६ मध्ये भारत दौऱ्यावर येणार असून कसोटी (चार दिवसीय सामने) आणि वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी बुधवारी (९ सप्टेंबर) भारतीय अ संघांची घोषणा झाली आहे.
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघ २२ सप्टेंबरपासून पहिला चार दिवसीय सामना खेळणार आहे, त्यानंतर २९ सप्टेंबरपासून दुसरा चार दिवसीय सामना खेळणार आहे. यानंतर ६, ९ आणि ११ ऑक्टोबर रोजी वनडे सामने या दोन संघात होतील. हे सर्व सामने पुद्दुचेरी येथे खेळवले जाणार आहेत.