

Lalit Modi praises Vaibhav Sooryavanshi
esakal
Why Vaibhav Sooryavanshi is called future of Indian cricket? इंडियन प्रीमिअर लीगचे माजी चेअरमन ललिल मोदी याने १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले आहे आणि हा मुलगा भारतीय क्रिकेटमधील भविष्याचा चेहरा असल्याचा दावा त्याने केला आहे. आयपीएल २०२६ मध्ये वैभवने राजस्थान रॉयल्सला आक्रमक सुरुवात करून देताना चार विजयांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने २ अर्धशतकांसह २६३.१६ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याच्या पॉडकास्टवर ललित मोदीने RR च्या युवा फलंदाजाबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे.