

Suryakumar Yadav Congratulates Successor Shreyas Iyer at Mumbai T20 League
Sakal
शनिवारी (६ जून) बीसीसीआयच्या निवड समितीने आगामी इंग्लंड - आयर्लंड दौरा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा टी२० संघ (India T20I Squad) जाहीर करताना नवा कर्णधार आणि उपकर्णधाराचीही घोषणा केली.
टी२० वर्ल्ड कप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) त्याच्या खराब फॉर्मचा फटका बसला. त्याला भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद गमावण्यासोबतच संघातील जागाही गमवावी लागली आहे. त्याच्या जागेवर आता श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) भारताचा नवा टी२० कर्णधार करण्यात आले असून तिलक वर्मा उपकर्णधार असेल.