India vs South Africa T20I series latest update
ESAKAL
India vs South Africa T20I series latest update: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला चौथा सामना लखनौमधील धुक्यात हरवला.. दृश्यता कमी असल्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर पोहोचले होते, परंतु धुक्यांमुळे टॉसच झाला नाही. हार्दिक पांड्यासह काही खेळाडू तोंडवर 'मुखपट्टी' घातलेले दिसले. रात्री ९ः२५ मिनिटांनी परिस्थितीचा आढावा घेतला गेला अन् अयोजकांनी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. यामुळे चाहत्यांच्या आनंदावर पाणी फेरले गेले आणि BCCI च्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.